अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या बड्या बाता अन् शेतकऱ्यांना…’, रविकांत तुपकरांचा घणाघात

मुंबई | Maharashtra Budget 2023 – काल (9 मार्च) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) जाहीर केला. या अर्थसंकल्पावरून आता विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा’ असं म्हणत रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी टीका केली आहे.

यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, “कापूस (Cotton) आणि सोयाबीनचा (soybean) उत्पादन खर्च भरुन निघेल एवढाही भाव खासगी बाजारात नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या घरात 70 ते 80 सोयाबीन आणि कापूस पडून आहे. त्यामुळे या सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचं विशेष पॅकेज घोषित करणं गरजेचं होतं. पण तसं या अर्थसंकल्पात काहीच झालं नाही.”

“जर शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं गरजेचं आहे. वीज शेतीला पूर्णवेळ मिळण्यासाठी आणि शेती पिकांचं जंगली जनावरांच्या त्रासापासून संरक्षण करण्यासाठी शेतीला कंपाऊंड करण्यासाठी भरीव तरतूद करणं गरजेचं होतं. 2022 मध्ये खरीप हंगामातील घोषणा केलेली अतिवृष्टीची मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पिकविम्यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे मागचं सोडून द्यायचं अन् पुढच्या घोषणा करत सुटायचं. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोपही रविकांत तुपकरांनी केला.

Sumitra nalawade: