“संजय शिरसाट यांची गुवाहाटी तर बच्चू कडू यांची…”, राष्ट्रवादीच्या नेत्याने उडवली खिल्ली

मुंबई | Ravikant Varpe On Sanjay Shirsat And Bacchu Kadu – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. मात्र, अखेर काल (24 सप्टेंबर) पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे यांनी वेळोवेळी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आणि आता तर शिंदे गटातील मंत्र्यांना 2-2 जिल्ह्यांचे पालकमंत्री केले तरीही शिरसाट आणि बच्चू कडू यांचा विचार केला नसल्याचं दिसून येत आहे.

यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्विट करत संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना टोला लगावला आहे. रविकांत वरपे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन…50 खोके! एकदम ओके!!” त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाली आहे.

Sumitra nalawade: