राज ठाकरेंचा भाजपला पाठिंबा, तरी धंगेकर थेट मनसे कार्यालयात!

पुणे : (Ravindra Dhangekar On MNS) पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील पोटनिवडणूक जोरदार चर्चेत आली आहे. शिवाय कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी आज मनसे कार्यालयात भेट दिली.

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांनी मनसे शहर कार्यालय गाठले. कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मनसे कार्यालयात स्वागत देखील करण्यात आले. मात्र मसनेसे भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मनसेने जरी भाजपला पाठिंबा दिला तरी सुद्धा धंगेकर आज मनसेच्या शहर कार्यालयात गेले. यापूर्वी देखील त्यांनी मनसे त्यांना पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला होता. धंगेकर यांची आज प्रचारासाठी नवी पेठेत पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी याच भागात असलेल्या मनसेचे शहर कार्यालयात हजेरी लावली. धंगेकर कार्यालयात येताच मनसे नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

धंगेकर यांनी याआधी सुद्धा मनसे मधील आपले सहकारी, मित्र आहेत असं विधान केले होते. त्यामुळे मनसेने जरी भाजपला पाठिंबा दिला असला तरी शहर मनसेत अजूनही भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे शहर मनसे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prakash Harale: