आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी स्विकारला पदभार

आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी आज पदभार स्वीकारला. संजय मल्होत्रा ​​रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारत आहेत. संजय मल्होत्रा ​​यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित गव्हर्नर म्हणून आरबीआयच्या मुख्यालयात स्वागत करण्यात आले. आज त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मंद विकास दर आणि उच्च महागाई दर अशा दुहेरी आव्हानाचा सामना अर्थव्यवस्थेसमोर असताना ते रिझर्व्ह बँकेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

संजय मल्होत्रा ​​यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा 
संजय मल्होत्रा ​​यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. सोमवारी संध्याकाळी केंद्र सरकारने त्यांची सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली होती आणि आज त्यांनी माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतली आहे.

कोण आहेत संजय मल्होत्रा ? 
राजस्थानमधील १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी मल्होत्रा ​​यांना सार्वजनिक धोरणाचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.  त्यांना पॉवर, फायनान्स आणि टॅक्सेशन यांसारख्या क्षेत्रात कौशल्य आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापूर्वी संजय मल्होत्रा ​​अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय, याआधी ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाचे सचिव पदावर होते.

Rashtra Sanchar: