विधान परिषदेत क्राॅस वोटींग करणाऱ्या काँग्रेसच्या सात गद्दार आमदारांची यादी तयार?

मुंबई : (Ready To List of Seven Congress MLAs) दिड महिन्यांपुर्वी महाविकास आघाडीत आणि मित्र पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत असताना, एकानाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची असा वाद न्यायालयात सुरु असतानाच आता राज्य काॅंग्रेसमध्येही बंडखोरीचे ग्रहण लागले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, 20 जुन रोजी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटींग केल्याचा आंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चौकशी करण्याकरता निरीक्षक म्हणून नेमलेल्या मोहन प्रकाश यांच्या अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. या अहवालानंतर आता त्या सात आमदारांवर कारवाई  होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधान परिषद निवडणुकीत काॅंग्रेसच्या सात आमदारांनी क्राॅस वोटींग केल्याचा आंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे प्रथम क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. दरम्यान, निरीक्षक मोहन प्रकाश यांच्या अहवालानुसार उत्तर महाराष्ट्रातील एक आमदार, मराठवाड्यातील दोन ते तीन आमदार आणि मुंबईतील दोन आमदारांच्या क्रॉस वोटींगचा अहवाल हायकमांडकडे दाखल झाला. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही कोणी बंडाखोरी केली तर आश्चर्य वाटायला नको.

Prakash Harale: