ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं; बंडखोर शहाजी पाटलांनी व्यक्त केली भावना!

मुंबई : (Rebel MLA Shahaji Patil On Shivsena) आज असलेल्या मैत्री दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याची इच्छा सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी बोलून दाखवली आहे. शिवसेना वाढावी ही प्रत्येक शिवसैनिकाची, पदाधिकारी आणि आमदार खासदारांची भावना आहे, असंही ते म्हणाले आहेत.

पाटील म्हणाले की, २ -४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सरकार चांगल काम करेल. राज्यपालांच्या वक्तव्यांवर विचारले असता दे म्हणाले, राज्यपालांबाबत एखादं विधान करणं गैर आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदाला एक वेगळं महत्त्व आहे. बोलताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. मुंबईबाबत त्यांचे विधान महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला एक प्रकारे वेदना देणारे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सगळेच विजयाचा दावा करतात. निकाल लागल्यावर वास्तव कळेल, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत जमणाऱ्या तुफान गर्दीवरुन लगावला आहे.

Prakash Harale: