मुंबई : (Rebel On Meet Devendra Fadnavis) शिवसेनेतील ४० आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी सेनेत उभी फुट पाडली. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होवा लागलं. यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तर दुसऱ्याच दिवशी बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं नविन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान, सरकार स्थापन होऊन १२ दिवस झाले तरी अद्द्याप शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? कोणाला किती मंत्रीपदं मिळणार? मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार? कोणाकडे कोणते खातं मिळणार? या सर्व गोष्टींतर तर्क-वितर्क लागवे जात आहेत. तर काही बंडखोरांच्या मंत्रीपदासाठी भेटीगाठी वाढल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात काही मोजक्या लोकांचा शपथविधी होण्याची माहिती बंडखोर आमदारांकडून समोर आली आहे.
या पार्श्वभुमीवर सध्या मंत्रीपदासाठी बंडखोरांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. तर काही चांगले खाते कसे मिळेल याकडं डोळे लावून बसले आहेत. मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील असं सांगितलं जात असताना, बंडखोर उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट का घेत आहेत. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ वाटपाचे अधिकार शिंदेंना आहेत की, फडणवीसांना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरुन शिंदे फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत का? अशा सामान्य जनतेमध्ये चर्चा रंगत आहेत.