अग्निपथ योजनेची भरती प्रक्रिया सुरू, केंद्र सरकारचा ‘झुकेगा नही साला’!

नवी दिल्ली | Agnipath Scheme 2022 – अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार सैन्य भरतीसाठी ठाम आहे. आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. तसंच एका बाजूला अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे आता भरती प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यंदाच्या अग्निवीर भरतीसाठी दोन वर्षांची अट शिथील करण्यात आली आहे. मागील दोन वर्षी सैन्य भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय हवाई दल आणि नौदलातील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. नौदलातल्या अग्निवीर भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन मंगळवारी, २१ जून रोजी निघणार असून वायुदलातील भरती प्रक्रिया २४ जूनला सुरू होणार आहे. भारतीय हवाई दलातील अग्निवीर भरतीच्या या तुकडीसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून सुरू होणार आहे. तर, प्रशिक्षणासाठीची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू आहे. ही प्रक्रिया ३० डीसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतीय नौदलातील अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेसाठी 21 जून रोजी नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे. ओदिशा येथील आयएनएस चिल्कामध्ये प्रशिक्षणासाठी 21 नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. नौदलात  महिला आणि पुरुष दोन्ही अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. नौदलात या आधीपासूनच विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी दाखल आहेत.

Sumitra nalawade: