व्यापारी बदनामीबाबत आ. रोहित पवारांची चिंता

पुणे : अनेक किरकोळ घटना आणि फसवणुकीचे प्रकारामुळे व्यापारी वर्गाचे नाव बदनाम होत आहे. त्याला चाप बसण्यासाठी संघटनेने सामूहिक शक्तीद्वारे काही ठोस नियम बनवले पाहिजे, याबाबत सोमवारी आ. रोहित पवार यांनी व्यापारी महासंघाच्या महासंवाद कार्यक्रमात चिंता व्यक्त केली. मोठ्या मॉल विस्तारवादामुळे लहान व्यापाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले. याबाबत देखील त्यांनी आपले काही विचार व्यक्त केले.

दुकानांच्या पाट्यांवर लागणार लोगो-

या बैठकीमध्ये आमदार रोहित पवार यांनी प्रत्येक दुकानाच्या पाटीवर व्यापारी संघटनेचा लोगो लावण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. त्यांनी सांगितले की संघटनेची एक सामूहिक शक्ती आहे, हे दाखवायचे असेल तर प्रत्येक पाट्यांवर एका साईडला संघटनेचा लोगो लावावा.

या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून संसदेमध्ये आपण आवाज पोहोचवू, त्याच पद्धतीने फूड कोर्ट स्नॅक्स सेंटर याबाबत काही ठोस नियमावली करावी, अशी सूचना त्यांनी व्यापारी महासंघाला केली. सर्व व्यापाऱ्यांनी इतिहास सॉफ्टवेअर मेंटेन करावे आणि प्रत्येक वॉलवर संघटनेचा लोगो लावावा, अशा सूचना त्यांनी केली. यावेळी पुणे जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुने, विकास मुंदडा, शिल्पा भोसले, पोपट ओस्तवाल, विजयी भंडारी, विशाल घोडके उपस्थित होते.

Nilam: