पुणे ः आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाचे जीवन गुंतागुंतीचे बनले आहे. त्यातच वाढता शारीरिक, मानसिक ताण यामुळे होणार्या विविध आजारांनी मनुष्यप्राणी हैराण आहे. कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. परंतु जगभरातील लाखो लोकांना फालुन दाफाच्या ध्यान अभ्यासामुळे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावर आश्चर्यकारक परिवर्तन जाणवले. म्हणूनच या साधनेचे संस्थापक गुरु ली होंगजी यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ‘‘१३ मे विश्वफालुन दाफा दिवस’’ म्हणून साजरा केला जातो.
‘‘फालुन दाफा’’ ही सत्य-करुणा-सहनशीलता या तीन तत्त्वांवर आधारित मन आणि शरीर यांचा विकास करणारी एक उच्चस्तरीय प्राचीन साधना प्रणाली आहे. यामध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायाम शिकविले जातात. हे व्यायाम व्यक्तीच्या ऊर्जावाहिन्यांना उघडणे, शरीराचे शुद्धीकरण करणे, तणावमुक्त करणे, तसेच आंतरिक शांतता प्रदान करण्यास सहायता करतात. फालुन दाफाच्या नियमित अभ्यासाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासदेखील मदत होते या प्राचीन साधनाप्रणालीची शिकवण , गुरु ली होंगजी यांनी १३ मे १९९२ रोजी सार्वजनिक केली आणि त्यानंतर गेल्या ३० वर्षांत ११४ पेक्षा जास्त देशांमध्ये १० कोटींहून अधिक साधकांनी ही साधना आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवली आहे.
फालुन दाफा भारतात अनेक शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये परिचित करण्यात आलेले आहे. तसेच वेळोवेळी याचा परिचय समाजातील विविध स्तरांवर केला जात आहे.
यातील व्यायाम व ध्यान सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विनामूल्य शिकवले जातात. फालुन दाफाची पुस्तके, व्यायाम निर्देश आणि अभ्यासस्थळांची अधिक माहिती www.falundafa.org या वेबसाइटवर आहे आणि अनेक भाषांमध्ये पुस्तके, व्हिडीओदेखील निःशुल्क उपलब्ध आहेत, अशी माहिती पुणे तेथील फालुन दाफा साधकांनी दिली.