रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठे बदल! नीता अंबानींचा राजीनामा, ‘या’ व्यक्तीकडे नवी जबाबदारी

Reliance Industries AGM 2023 : आज दिनांक सोमवार दि. 28 ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या एजीएममधून मोठी बातमी समोर आली आहे. एजीएम अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, काही वेळातच त्यांची रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी मुलगी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे. RIL बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली आहे.

मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत म्हटले की, नवा भारत कधीच थांबत नाही, कधीच हारत नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीज आपले घर, पृथ्वी, देश आणि कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांची काळजी घेते. नवीन रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास कटिबद्ध आहे. RIL चे प्रमुख 46 व्या एजीएम प्रसंगी म्हणाले की, आता वेळ आली आहे जेव्हा उद्योजकांनी एकत्र काम केले पाहिजे जेणेकरुन आपण 2047 पर्यंत भारताला विकसित आणि समृद्ध बनवू शकू, त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Prakash Harale: