नवी दिल्ली | Ashish Deshmukh – सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये (Congress) चांगलाच गदारोळ सुरू आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी नाना पटोले (Nana Patoel) यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आशिष देशमुख यांनी ही मागणी ट्विटद्वारे मलिक्कार्जुन खर्गे यांना केली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काळ बदलण्याची नितांत गरज आहे. या संबंधित निवेदन मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री. खर्गेजी यांना केली आहे.
आशिष देशमुख यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, नाना पटोलेंची (Nana Patole) जी कार्यशैली आहे त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ काँग्रेसच्या हातातून निसटत चालला आहे. तसंच फक्त आत्ताचीच निवडणूक नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकींचा दाखला देताना पक्षातील बेबंदशाही थांबली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही बेबंदशाही जर थांबली नाही तर शिंदे गटाच्याही मागे पडून काँग्रेस पाचव्या क्रमांकावर ढकलला जाईल, असं आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.