प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा काळाच्या पडद्याआड

मुंबई : आज प्रख्यात संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. संतूरवादनासोबतच ते एक उत्तम गायकही होते. शिवकुमार शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. संतूर या वाद्याला लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय यांनाच जातं.

तसंच शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.याचप्रमाणे त्यांनी १९६७ साली बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित बृजभूषण काबरा यांच्यासोबत त्यांनी अल्बम ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा शास्त्रीय संगीतातला एक प्रसिद्ध अल्बम केला होता.

चित्रपटसृष्टीत त्यांनी १९८० साली सिलसिला या चित्रपटापासून सुरुवात केली होती. शिवकुमार शर्मा यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेकवेळा संगीत दिल्यामुळे या जोडीला शिव-हरी या नावाने ओळखले जातं होते. यासोबतच त्यांना १९८५ मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं होत.

Nilam: