“मी Pansexual आहे, माझ्या शरीराची मला लाज वाटायची”, ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

मुंबई | Revealed By Monica Dogra – प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायक मोनिका डोग्रा हिनं काही दिवसांपूर्वीच एक खुलासा केला होता. मोनिका डोग्रानं आपण Pansexual असल्याचा खुलासा केला होता. तसंच तिनं तिच्या लग्नाची बातमीही खूप दिवस मीडियापासून लपवून ठेवली होती. त्याचबरोबर जेव्हा तिला पहिल्यांदा आपण Pansexual असल्याचं समजलं, त्याविषयी एका न्यूज पोर्टलमध्ये बोलताना ती म्हणाली, मला Pansexual आहे हे कळण्याआधी, केवळ पाच-सहा वर्षापूर्वीच मी या शब्दाविषयी ऐकलं होतं. आणि तेव्हा लगेच मला वाटलं मी सुद्धा त्यापैकी एक आहे. माझ्यासोबत खूप विचित्र घडतंय असं वाटत होतं. एकतर तुम्ही समलैंगिक असता किंवा नसता. जर मी समलैंगिक आहे किंवा गे आहे असं सांगितलं असतं तर कुणीच माझा स्विकार केला नसता. ‘गे’ देखील असा शब्द होता ज्याच्याविषयी समाजात फार काही चांगलं बोललं जात नाही”.

“शाळेत असताना मी अगदी टॅामबॅाय सारखे वागायचे. आणि जसजशी मी मोठी होत गेले तेव्हा मी स्त्रीत्वाचा देखील आनंद घेतला, अगदी जरा जास्तच. मला दोन्ही लिंगांच्या व्यक्तींसमोर स्वत:ला एक्सप्रेस करायला, त्यांना माझ्याकडे आकर्षित करुन घ्यायला आवडायचं. कॉलेजमध्ये असताना मी कधी कुठल्या मुलीला किस वगैरे केलं नाही. तोपर्यंत मी माझ्यातील स्त्रीत्वाचा आनंद घेत होते”, असं मोनिका डोग्रानं म्हटलं आहे.

”पण नंतर अचानक माझ्यात बदल होऊ लागले, मी नक्की कोण आहे याविषयी मनातला संभ्रम वाढत गेला. मग मला वाटलं कदाचित मी bisexual आहे, मला पुरुष आणि स्त्रीया दोन्ही आवडतात. आणि तोपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की Pansexual म्हणजे नक्की काय आहे. पण मला एक मात्र कळालं होतं की मला स्त्री आकर्षण असलेले पुरुष आणि पुरुषांचे आकर्षण असलेल्या स्त्रिया हे दोघंही आवडत आहेत. Pansexuality चे खूप शब्द माहित झाल्यावर आता मात्र आपण कशात फिट बसतोय याविषयीची आपली आवड मी पक्की केली असल्याचं मोनिका म्हणाली”.

”मी अनेक वर्षांपासून माझ्या सेक्शु्अॅलिटीविषयी खरंच बोलत आल्याचं मोनिका म्हणते. पण लोकांनी हे तेव्हा नोटिस केलं जेव्हा माझी सिरीज ‘द मॅरिड वूमन’ रिलीज झाली. यामध्ये एक बॉयफ्रेंड असताना देखील एका लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमात मी पडते असं दाखविलं आहे. मी जसजशी मोठी होत गेले तसतशी मला माझीच लाज वाटायला लागली. माझ्या शरीराच्या काही भागांची मला लाज वाटायची. पण आता मी हे सगळं स्विकारलं आहे”, असं देखील मोनिकानं म्हटलं आहे.

Sumitra nalawade: