छत्रपती संभाजीनगर | NA Tax Free – टॅक्सधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्यात येणार आहे. त्यामुळे खेरदी करताना एकदाच ‘एनए’ (One Time Tax) भरावा लागणार आहे. याबाबतची घोषणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. रविवारी (16 एप्रिल) क्रेडाई महाराष्ट्रच्या 2023-25 च्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी विखे पाटील बोलत होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, जमीन घेतल्यानंतर ती प्रत्येक वर्षी एनए करावी लागते, याचा लोकांना मोठा त्रास होता. त्यामुळे आता जमीन खरेदी करताना एकदाच एनए भरावा लागणार असल्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. एकदा एनए टॅक्स भरल्यानंतर परत तो भरण्याची गरज नाही.
या निर्णयामुळे सरकारचा काही महसूल बुडेल, पण प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना याचा फायदा देता येईल. तसंच भूमी आभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते आता 15 दिवसांमध्ये घरपोच देण्यात येतील, असंही विखे पाटील यांनी सांगितलं.