“तुम्हाला काय वाटलं मी परत नाही येणार, घाबरून जाईन…”, रिया चक्रवर्तीचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन

मुंबई | Rhea Chakraborty – अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या चांगलीच चर्चेत आहे. रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. बराच काळ रिया मनोरंजन क्षेत्रापासून दूर होती. तसंच आता ती एमटीव्हीवरील ‘रोडीज’ (MTV Roadies) या शोमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

लवकरच ‘रोडीज’चा 19 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचा प्रोमो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रिया चक्रवर्ती दिसत आहे. ‘रोडीज कर्म या कांड’च्या प्रोमोमध्ये रिया ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. यावेळी ती म्हणते की, “तुम्हाला काय वाटलं होतं मी परत नाही येणार, मी घाबरेन..घाबरण्याची वेळ तर दुसऱ्याची आहे. चला ऑडिशनला भेटू.”

दरम्यान, या शोमध्ये रियासोबत प्रिन्स नरूला आणि गौतम गुलाटी गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच चाहते रोडीज या शोची आतुरतेनं वाट पाहत होते. तर या शोचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.

Sumitra nalawade: