चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; रिंकू राजगुरूच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ होतोय ‘या’ दिवशी रिलीज

सैराट या पहिल्या चित्रपटानंतर रिंकू राजगुरू कुठे थांबणार आहे वाटत नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड या चित्रपटात रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यानंतर रिंकूचा नवा चित्रपट कधी रिलीज होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते, अखेर ही प्रतीक्षा संपली असून रिंकूने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

खुशबू सिंह दिग्दर्शित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचं पोस्टर रिंकूने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. कॅप्शन मध्ये तीन म्हणतेय
“तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू…
‘कृतिका’च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू.
टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!”

चित्रपटाची निर्मिती राकेश राऊ, समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे. 17 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Dnyaneshwar: