गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

नागपूर | Gautami Patil | सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती नृत्यांगना गौतमी पाटीलची (Gautami Patil). गौतमी पाटीलनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आज तिचा चाहता वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. पण गौतमीचे कार्यक्रम जिथेही होतात तिथे दंगा होतोच. आताही नागपुरात (Nagpur) झालेल्या गौतमीच्या कार्यक्रमात जोरदार हुल्लडबाजी करण्यात आली. त्यामुळे हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून देखील सौम्य लाठीमार करण्यात आला.

नागपुरातील हिल टॉप परिसरात एका गणेश मंडळानं गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी गौतमीनं तिचा डान्स सुरू करताच तरूणांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ करण्यास सुरूवात केली. तर अनेक तरूण प्लास्टिकच्या खुर्च्यांवर उभे राहीले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खुर्च्या तुटल्या.

काही हुल्लडबाज तरूणांनी तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडेही हवेत भिरकावले होते. तर समोरच्या तरूणांना पाठीमागे उभे असलेले तरूण वारंवार धक्का देत असल्यामुळे समोरचे बेरिकेट खाली कोसळले. त्यामुळे या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

Sumitra nalawade: