शरद पवारांपासून जीवाला धोका; म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांच्या सुरक्षेत वाढ!

मुंबई : (Home Minister Dilip Walase On Sadabhau Khot security issue) रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या हॉटेल प्रकरणानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खोत यांच्या जीविताला काही धोका आहे असं मला वाटत नाही. पण तरीही त्यांच्या तक्रारीनुसार मी राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की, त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी.

दरम्यान, पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत सांगोल्याला होते. गाडीतून खाली उतरलेल्या खोत यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गराडा होता. त्यावेळी गर्दीतून पुढे येणारे मांजरी येथिल हाॅटेल व्यावसायिक अशोक शिनगारे यांनी खोत यांना रोखत जाब विचारत ते म्हणाले, सन २०१४ चे हाॅटेलमध्ये खाल्लेलं बिल द्या आणि मग पुढे जा. यानंतर खोत यांनी राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगत हा आरोप केला होता.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीबाबत विचारलं असता ते म्हणाले, या निवडणुकीची महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळी तयारी करत आहेत. राज्यसभेवेळी परिस्थिती वेगळी होती, सध्या विधानपरिषदेची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Prakash Harale: