“मी त्यांचा कायम ऋणी राहीन”… रिषभ पंतची भावनिक पोस्ट

मुंबई | Rishabh Pant – क्रिकेट खेळाडू रिषभ पंत याने अपघातातून सावरल्यानंतर एक भावनिक ट्वीट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. या ट्वीट मध्ये त्याने दोन तरुणांनाचा खास उल्लेख करत त्यांचे खास आभार मानल आहेत. संबंधित तरुणांचे फोटो शेअर करत “मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन” असं पंतने लिहिलं आहे. संबंधित दोन तरुणांनी अपघाग्रस्त रिषभ पंतची मोलाची मदत केली होती. या तरुणांची नावे रजत कुमार आणि निशू कुमार अशी आहेत.

रिषभ पंतने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही. परंतु हे दोन हिरो रजत कुमार आणि निशू कुमार यांचे मी आभार मानू इच्छितो. अपघात झाल्यानंतर याच तरुणांनी माझी मदत केली. मी सुरक्षितपणे रुग्णालयात कसा पोहोचेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन.”

Dnyaneshwar: