उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर रितेश देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई | Riteish Deshmukh’s Post In Discussion – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान आज (गुरूवार) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री (CM) असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखने देखील पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेशने म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचे पुरोगामी, कृतीशील आणि काळजी घेणारे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी यांचे खूप खूप आभार. मानवतेने आजवरच्या सर्वात कठीण काळात करोना साथीच्या आजाराशी सामना करताना, आम्हा नागरिकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.” तसंच रितेशची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यात फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मविआ सरकारमधले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 

Sumitra nalawade: