‘नातं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा…’ रितेशनं जेनेलियासोबतच्या नात्यातील सांगितली मोठी गोष्ट

मुंबई : (Ritesh Deshmukh On Janelia D,suaza) सुरु असलेल्या ‘सकाळ स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत नागरिकांना तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, अध्यात्म आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. या निमीत्त अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी व्हेगन जीवनशैलीचा प्रवास याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नातं कसं जोडायचं आणि टिकवायचं याबद्दल रितेशने काही सल्लेही दिले आहेत.

हसणे हे सर्वात चांगला उपचार कसा आहे याबद्दलच स्वास्थ्यममध्ये रितेश आणि जेनेलिया यांनी खास गप्पा मारल्या. हसणे हे आपल्याला आनंद देते. आणि हेच हसणे औषध सुद्धा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यातच जेनेलियाने सांगितलं की ६ वर्षांपूर्वी आम्ही शाकाहारी होतो आणि ४ वर्षांपूर्वी व्हेगन झालो आहोत.

त्यानंतर नात कसं यशस्वी करावं याबद्दलही सांगितलं. रितेश म्हणाला की, “आपण नात्यावर अपेक्षांचं ओझं लादतो. समोरच्या माणसाची गरज मोठी होते तेव्हा नातं अयशस्वी होतं” दोघांच्या नात्याबद्दल बोलतांना रितेश म्हणाला की, “५००० रुपयांच्या वरच गिफ्ट असेल तर जेनेलियानी नियम केला आहे की मग वर्षभर गिफ्ट द्यायचं नाही. तिचं म्हणनं असते की गिफ्ट देऊ नका वेळ द्या.” म्हणजेच नात्यात मोठ मोठ्या गिफ्ट किंवा देखाव्याची गरज नसते केवळ एकमेंकाना वेळ दिला की नातं आपोआप जपलं जातं. पुढे बोलतांना तो म्हणाला की कितीही मोठी चूक असली तरी माफ करायला शिका. यामूळे नातं मजबूत होतं.

Prakash Harale: