पवारांकडून शाहरुख खानचं कौतुक! म्हणाले, ‘जवान’ चित्रपटात लोकशाहीची ताकद दाखवली;

मुंबई : (Rohit Pawar On Shahrukh Khan Movie Jawan) शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. जवान सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवा पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटामध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे , अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं आहे.

कल्याणमधील एका कार्यक्रमात अगरवाल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोहित पवार म्हणाले, ‘शाहरुख खान यांच्या ‘जवान’ या चित्रपटामध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात लोकांचे वास्तव प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद वापरत नाहीत, तोपर्यंत चांगल्या विचारांचे लोक निवडून येणार नाहीत’.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘ शरद पवार हे अंबानी-अदानी यांच्यासह छोट्या व्यवसायिकांनाही भेटतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचा देशाचा विकास कसा करता येईल, याबाबत कोठे ना कुठेतरी चर्चा होत असते. त्यावरून आपण योजना करतो, सगळ्या घटकाला भेटल्याशिवाय योजना कधीही करता येत नाही’.

Prakash Harale: