“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं…”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबई | Rohit Pawar – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बेळगावमध्ये ‘कन्नड रक्षण वेदीके’ सारख्या संघटनांकडून महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक वाद चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) टीकास्त्र सोडलं.

“वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”, असं रोहित पवार म्हणाले.

“महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही”, अशी खोचक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)