“जिथून भाजपचा राजकीय विचार संपतो, तिथून शरद पवार…”, रोहित पवारांचं भाजपवर टीकास्त्र

rohit pawar fadnavisrohit pawar fadnavis

कोल्हापूर | Rohit Pawar – आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. जिथून भाजपचा राजकीय विचार संपतो, तिथून शरद पवारांचा (Sharad Pawar) विचार सुरू होतो, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर टीका केली आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) कोल्हापुरात शरद पवारांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी रोहित पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष फुटल्यानंतर एक वर्षांनी भाजपवर टीका केली. पण शरद पवार साहेबांनी पहिल्यापासूनच भाजपवर टीका केली आहे. जे मुळावर घाव घालून गेले आहेत त्यांना महत्त्व द्यायचं नाही हे पवार साहेबांच्या डोक्यात असेल.”

“एका पत्रकारानं शरद पवार साहेबांना विचारलं होतं की आपल्यासोबत किती आमदार आहेत. त्यावेळी शून्य असं साहेबांनी उत्तर दिलं होतं. आमदारांपेक्षा लोकांची ताकद घेऊन विचार जपण्याची गरज असल्याचं साहेबांनी सांगितलं होतं. तसंच भाजपनं पक्ष फोडला, घर फोडलं पण राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर दोन पक्ष फोडले आहेत. त्यामुळे वार हा मुळावर होणं गरजेचं आहे. साहेब तर थेट मुळावर घाव घालतात”, असंही रोहित पवार म्हणाले.

admin:
whatsapp
line