IPL 2023: “सूअर झुंड में आते हैं, शेर तो…”रोहित शर्मा फोटोशूट मधून गायब अन् मिम्स व्हायरल

मुंबई : (Rohit Sharma fans memes viral) अवघ्या काही तासांवर आलेल्या आयपीएलचा फिव्हर नेटकऱ्यांवर चढताना दिसत आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ट्रॉफीसह कर्णधारांचे फोटोशूट झाले. त्यात केवळ नऊ कर्णधार होते आणि आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा गायब होता. त्यानंतर क्रिकेट जगतात अनेक सवाल उपस्थित होऊ लागले.

दरम्यान, नेटकऱ्यांनी उपस्थित होणाऱ्या प्रश्नाला भन्नाट उत्तर दिलं आहे. ‘सूअर झुंड में आते हैं, शेर अकेला आता है’. अशा आशयाचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

भारत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या प्री-कॅप्टनशिप फोटोशूटमधून गायब झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माची तब्येत चांगली नाही. यामुळे तो अहमदाबादला जाऊ शकला नाही.

मुंबईला 2 एप्रिलला पहिला सामना RCB विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळायचा आहे. या सामन्यापर्यंत रोहित तंदुरुस्त होतो की नाही हे पाहावे लागेल. आजपासून आयपीएल 2023 चा 16 हंगाम सुरू होती आहे. आज सायंकाळी 7:30 वाजता सलामीचा सामना गतवेजेत्या गुजरात आणि चेन्नई यांच्यात होणार आहे.

Prakash Harale: