Rohit Sharma Favorite Food : मुंबईकरांना वडापाव ( Vada Pav ) म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. वडापाव ही मुंबईकरांची जणू एक ओळखच आहे. टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील वडापावचा खूप मोठा फॅन असल्याचं म्हटलं जातं. अनेकदा यावरून हिटमॅनला ट्रोलही करण्यात येतं. रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
मात्र, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या फेवरेट डीशबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करणाऱ्या सोशल मीडियावरील त्याच्या ट्रोलर्सला हि मोठी चपराक मानली जात आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind Vs Aus ) यांच्यात सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यात आलाय. 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये रंगणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार आहे. यामध्येच रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहितने (Rohit Sharma) त्याची फेवरेट डीश सांगितली आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, आम्ही काही वेगळं खाणं खात नाही. जे सामान्य लोकं जेवतात, ते पदार्थ आम्ही खातो. मला डाळ-भात प्रचंड आवडतो. मुळात डाळ भात सर्व ठिकाणी सहजरितीने उपलब्ध असतो. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला डाळ ही मिळणारच.