आशिया कपसह वर्ल्डकपपूर्वी रोहित शर्मा सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या चरणी लीन! व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया लवकरच आशिया कप खेळणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्मा सहकुटुंब आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या चरणी लीन झाला आहे. त्याचे दर्शानाला दाखल झाल्याचे फोटो व्हिडिओ समोर आले आहेत. रोहित शर्मासह त्याची पत्नी रितीका आणि मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हित शर्मा आगामी काळात आशिया कप स्पर्धा आणि वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. यंदाच्या आशिया कप स्पर्धेची सुरुवात ३० ऑगस्टपासून होणार आहे. आशिया कप स्पर्धेचं संयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आलेलं आहे.

पहिली लढत पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहूप्रतिक्षीत लढत २ सप्टेंबरला श्रीलंकेत होणार आहे. रोहित शर्मा यंदा प्रथमच टीम इंडियाचं वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत तरी भारताला विजेतेपद मिळून गेल्या १२ वर्षांचा दुष्काळ संपणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Prakash Harale: