पुणे : आंबेगाव व शिरूर तालुक्यात शून्य ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ३६ दरवाजे (गेट) असलेले साठवण बंधारे कामांसाठी महाराष्ट्र जल संधारण महामंडळ औरंगाबाद मार्फत ३८ कोटी १७ लाख ३१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
ई- निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
येथील स्थानिकांचे पिण्याच्या जपण्याचे आणि शेरीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायती कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांकडून सतत साठवण बंधाऱ्यांच्या कामाची मागणी केली जात होती.
मंजूर झालेला निधी आणि काम याचे व्यवस्थापन:
आंबेगाव : वाळुंजवाडी पिराचा ओढा- ९८ लाख ५३ हजार रुपये, लाखनगाव- २० लाख २२ हजार रुपये, महाळूंगे पडवळ क्रमांक एक फुलेवाडी स्मशानभूमी- २६ लाख हजार ९३ रुपये, महाळुंगे पडवळ क्रमांक दोन फुलेवाडी बामन शेत-२३ लाख ९१ हजार रुपये, महाळुंगे पडवळ क्रमांक तीन फुलेवाडी- ३२ लाख १३ हजार रुपये, रानमळा सोनर मळा- १९ लाख ३८ हजार रुपये, लोणी खोमणे वस्ती- २१ लाख ३५ हजार रुपये, निघोटवाडी १७ कोटी २५ लाख ५५ हजार रुपये.
“निघोटवाडी- पांडवदरा हे गाव उजव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहे. येथील बंधाऱ्याच्या कामाची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार येथे दरवाजे (गेट) असलेला साठवण बंधाऱ्याच्या कामांसाठी १७ कोटी २५ लाख ५५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. बंधाऱ्याची लांबी १६० मीटर व उंची २३ मीटर आहे. १९७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पाणी साठवण क्षमता,९१२. ६४ स.घ.मी आहे.”
शिरूर : रावडेवाडी क्रमांक एक- २५ लाख दहा हजार रुपये, रावडेवाडी क्रमांक तीन- २६ लाख दोन हजार रुपये, रावडेवाडी क्रमांक दोन – २६ लाख चार हजार रुपये, रावडे वाडी क्रमांक चार- २७ लाख १९ हजार रुपये, सविंदणे शिंदे वस्ती- ३८ लाख ११ हजार रुपये, कवठे येमाई इचकेवाडी खार नाला- एक कोटी १२ लाख ८३ हजार, कवठे यमाई कांदळकर वस्ती- एक कोटी २३ लाख ९५ हजार, रावडेवाडी क्रमांक पाच २७ लाख १६ हजार रुपये, गणेगाव खालसा बौद्ध वस्ती- ४३ लाख सात हजार रुपये, गणेगाव खालसा मलठण रस्ता- ३७ लाख ८६ हजार रुपये, गणेगाव खालसा गणेश नगर-३७ लाख ८३ हजार रुपये, गणेगाव खालसा बांगर वस्ती क्रमांक एक- २८ लाख २०हजार रुपये, धामारी क्रमांक एक- २६ लाख ५६ हजार रुपये, कानुर मेसाई क्रमांक एक- २५ लाख ७१ हजार रुपये, कानुर मेसाई माळीमळा-६२ लाख ५९ हजार रुपये, पाबळ क्रमांक एक-२६ लाख २५हजार रुपये, पाबळ क्रमांक दोन-२६ लाख नऊ हजार रुपये, सविंदणे भाटूक स्थळ- ३७ लाख ७२ हजार रुपये, गणेगाव खालसा बांगर वस्ती क्रमांक दोन-२८लाख १७ हजार रुपये, वरुडे शिंगाडे वस्ती- ४१ लाख ३१ हजार रुपये, सविंदणे सोन मळई- ३६ लाख ९१ हजार रुपये, सविंदणे वाडी-३८ लाख ५३ हजार रुपये , सविंदणे मावलाई-३५ लाख १० हजार रुपये, सविंदणे नरवडे वस्ती- ४३ लाख ५० हजार रुपये, केंदूर माळीमळा- एक कोटी सात लाख रुपये, मुखई येवले निलख वस्ती – एक कोटी ११ लाख ९५ हजार रुपये, केंदुर पऱ्हाड मळा- दोन कोटी ७१ लाख दोन हजार रुपये, सोनेसांगवी- तीन कोटी ६७ लाख ३६ हजार रुपये.
_नवनाथ निघोट, सरपंच निघोटवाडी