‘कसबा’ निवडणूकीसाठी इच्छुक असणाऱ्या, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील थेट CM शिंदेंच्या भेटीला

पुणे : (Rupali Thombare Patil meet CM Eknath Shinde) कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपुर्वी निधन झालं. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पुण्यातील (Pune) फायर ब्रॅड नेत्या आणि प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil) कसबा पोटनिवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं विधान केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.

दरम्यान, आज बुधवार दि. 28 रोजी रुपाली पाटील ठोंबरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) भेटण्यासाठी नागपुरामध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात एफआयआर (FRI) दाखल करा, अशी मागणी करणारे निवेदनही दिलं. मात्र, शिंदेच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

यावेळी शेवाळे यांच्याविरोधातले पुरावेही रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले. राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला होता. हा विषय राज्याच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच पेटला होता. या तरुणीचे दाऊदशी संबंध असल्याचं राहुल शेवाळेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा या तरुणीने राहुल शेवाळेंचं पाकिस्तान, कराची कनेक्शन असल्याचे आरोप केले आहेत.

Prakash Harale: