पुणे : (Rupali Thombare Patil On Rahul Shewale) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेना आणि शिंदे गटातील वाद उफाळून येताना दिसत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत संशयीत दिशा सालियानी आत्महत्या मृत्यू प्रकारणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी राहुल शेवाळेंचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. शेवाळे हे एका महिलेचे चुंबन घेताना त्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या महिलेकडून फेसबुक लाईव्हद्वारे शेवाळेवर अनेक गंभीर आरोप केले.
या आरोपानंतर शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत, त्या महिलेचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला. शिवाय ते म्हणाले, माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत लैंगिक अत्याचारातून हात झटकले आहेत. त्यांच्या या दाव्यावर पुण्याच्या राष्ट्रवादीच्या फायरब्रॅंड नेत्या रुपाली ठोंबरे पाटील चांगल्याच संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या राहुल शेवाळे स्वतः शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. शेवाळेंना असं बोलताना जरा थोडी तरी लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात त्यांना शेवाळेंना फटकारलं आहे.
आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे शेवाळे शिवसेनेच्या चांगलेच रडारवर आले आहेत. शेवाळे यांच्याविरोधात ज्या महिलेने लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाची तक्रार दाखल केली आहे, तिला पोलिस संरक्षण देत त्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. एका बाजूला शेवाळे म्हणतात की, या महिलेचा दाऊदशी संबंध आहे. तर मग शेवाळे आणि या महिलेचे जवळचे संबंध होते. अगदी वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ शेवाळे यांनी दाऊदतच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली, असा अर्थ घ्यायचा का?, असा सवालही रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला आहे.