सीमा हैदरमुळे सचिन आला अडचणीत; आर्थिक स्थिती झाली बिकट, एक वेळचं जेवणही मिळेना

Seema Haider Case – पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर (Seema Haider) सध्या चांगलीच चर्चेत आहे. सीमा ही सचिन मीनाच्या प्रेमासाठी बेकायदेशीरपणे भारतात आली. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच आता सीमा आणि सचिननं लग्न केलं असून ते सध्या नोएडामध्ये राहत आहेत. सीमा भारतात आल्यापासून तिच्याबाबत अनेक वेगवेगळे संशयही व्यक्त केले जात आहेत. तर आता सीमामुळे सचिन आणि त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. सचिनची नोकरी गेली असून त्यांना एक वेळचं जेवणही मिळणं कठीण झालंय.

सीमा आणि सचिन त्यांच्या कुटुंबासह नोएडा येथे राहत आहे. मात्र, आता हे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून याबाबत सचिनच्या वडिलांनी पोलिसांना पत्र लिहिलं आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, सचिन मीनाचे वडील नेत्रपाल मीना यांनी वरिष्ठ पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाला खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असून आर्थिक स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, कुटुंबावर आलेल्या आर्थिक समस्येवर सीमानं खंत व्यक्त केली आहे. सचिनच्या कुटुंबासमोर निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे मला काळजी वाटत आहे. तसंच तपासामुळे सचिन आणि कुटुंबियांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे मला वाईट वाटत असल्याचं सीमानं सांगितलं.

admin: