सोलापूर – Sadabhau Khot on Farmer | पुण्यातील देहू येथे झालेल्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजपवर यावरून राष्ट्रवादीने जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का?, मला या लोकांचं हसूच येतं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.
दरम्यान, तुम्ही रामाकडे जा नाहीतर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही कधीच उतरले आहात. एकीकडे रामनामाचा जप करायचा आणि दुसरीकडे काँग्रेसला हिरवा झेंडा नाचवायला द्यायचा दोन्ही गोष्टी एकावेळी शक्य होईल?, असा सवाल करत खोत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.