मुंबई | Sadhvi Prachi – यंदाचा ऑस्कर (Oscar) भारतासाठी एकदम खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. तर एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) गाण्यालाही ऑस्कर मिळाला. या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच आता ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची (Sadhvi Prachi) यांनी अजब ट्विट केलं आहे.
‘नाटू नाटू’ ला ऑस्कर मिळाल्यानंतर प्राची साध्वी यांनी ट्विट करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जब फिल्म में किरदार का नाम ही राम और सीता हो, वो फिल्म भला ऑस्कर क्यों नहीं लायेगी.. बधाई हो भारत.” साध्वी प्राची यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
साध्वी प्राची यांनी केलेल्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, “याचा अर्थ पंतप्रधान मोदींना अभिनयासाठी ऑस्कर कधीच मिळणार नाही. कारण, त्यांच्या नावात राम नाहीये.” तर दुसऱ्यानं “तुम्ही डॉक्टरची पदवी कुठून घेतली?” अशी कमेंट केली आहे.