सहकार प्रशिक्षणामुळे चळवळ मजबूत होणार


पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

बालगंधर्व नाट्यगृहात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या ‘राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र’ उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरिया आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करून ती चळवळ टिकविण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे.

admin: