‘सैराट’ चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण; रिंकूने शेअर केला ‘तो’ खास फोटो

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटानं प्रत्येकाला वेड लावलं आहे. कारण सैराट या चित्रपटाला ६ वर्षे उलटली आहेत. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहिल्याशिवाय राहावत नाही. तसंच हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता या चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्तानं रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंड, अरबाज शेख दिसत आहेत. तसंच हा फोटो शेअर करत सैराटला ६ वर्ष पूर्ण झालीत असं कॅप्शन रिंकूने दिलं आहे. त्याचबरोबर रिंकूने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Sumitra nalawade: