राखी सावंत : राखी सावंत हे नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वी पापाराझी यांना बोलताना म्हटले की, आता मी आदिल दुर्रानी याला घटस्फोट देणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन आल्याय. दुबईमधील व्यक्तीच्या प्रेमात राखी पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राखी सावंत ही सतत दुबईला जाताना दिसते. तिथे तिने एका अकाडमी देखील सुरू केली आहे.
राखी सावंतच्या नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंतने पायात चप्पल न घातल्याचा व्हिडीओ वायरल होत आहे. पायामध्ये चप्पल घातली नसल्याच्या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही विमानतळावर दिसत आहे. यावेळी पापाराझी यांनी राखी सावंत हिला चप्पल का नाही घातली हे विचारले.
मी नवस मागितला आहे. सलमान खानच्या लग्नासाठी नवस केलाय. सलमान खानने लवकर लग्न करावे यासाठी हा नवस आहे. जोपर्यंत सलमान खान लग्न करणार नाहीत तो पर्यंत मी चप्पल अजिबात पायामध्ये घालणार नाहीये. असे राखी सावंत यांनी म्हटले.
श्रीलंका, दुबई सर्वत्र मी चप्पल न घालताच फिरणार असल्याचे देखील राखी सावंत हिने म्हटले आहे. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून राखी सावंत हिची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. राखी सलमान खान कधीच लग्न करणार नाहीये आता तुला कधीच चप्पल घालता येणार नाही.अश्या प्रकारच्या कंमेंट त्या व्हिडीओ वर येत आहेत.