Breaking News : साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर केले लैंगिक शोषणाचे आरोप

नवी दिल्ली | Brijbhushan Singh – भारतीय महिला कुस्तीपटू (Wrestler) साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे (Sexually Harassed) आरोप केले आहेत. तसंच या दोघी बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात आंदोलनाला बसल्या आहेत.

आपल्या वैयक्तिक जीवनात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत आहे. तसंच यावरुन आम्हाला त्रास दिला जात असून आमचा छळही केला जात आहे. ज्यावेळी आम्ही ऑलिम्पिकमध्ये गेले होतो तेव्हा आम्हाला फिजिओथेरपिस्ट आणि कोचही दिला गेला नाही. तेव्हापासून आम्ही आवाज उठवत आहोत. त्यामुळे आम्हाला धमक्या देखील दिल्या गेल्या आहेत, असा आरोप भारतीय महिला कुस्तीपटूंनी केला आहे.

दरम्यान, महिला खेळाडूंना आणि महिला प्रशिक्षकांना पुरुष प्रशिक्षकांकडून त्रास दिला जात आहे. तसंच जे फेडरेशनच्या मर्जीतले प्रशिक्षक आहेत त्यांनीही महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तन केलं आहे. तसंच त्यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं आहे. तर खुद्द फेडरेशनच्या अध्यक्षांनीच (Brijbhushan Singh) अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याचा आरोप कुस्तीपटू विनेश फोगाटनं केला आहे.

Sumitra nalawade: