मुंबई | Salman Khan – उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) विवाहबंधनात अडकणार आहे. तसंच काल (19 जानेवारी) अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा देखील या सोहळ्यामध्ये उपस्थित होता. यावेळी सलमाननं (Salman Khan) एका तरुणीसोबत एन्ट्री केली होती. मात्र, ही सुंदर तरुणी कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला सलमाननं (Salman Khan) त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलिझेह खान अग्निहोत्रीसोबत (Alizeh Agnihotri) हजेरी लावली होती. या सोहळ्यात सलमानची भाची अलिझेह खान अग्निहोत्रीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अलिझेह ही सलमानची मोठी बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.
या सोहळ्यामध्ये सलमान ब्लू सिल्क कुर्ता आणि ब्लॅक शूज अशा लूकमध्ये दिसत होता. तर त्याची भाची अलिझेह ही व्हाईट लेहंग्यामध्ये दिसली होती.
दरम्यान, सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलिझेह सौमेंद्र पाधी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.