अक्षय कुमारचा ‘तो’ व्हिडीओ पाहून सलमान खानही झाला भावूक, पाहा नेमकं काय घडलं

मुंबई | Salman Khan And Akshay Kumar – बाॅलिवूडचा (Bollywod) प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे नेमहीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. सलमान खान आणि अक्षय कुमार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बऱ्याचदा ते एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. तसंच आता अक्षयचा एक व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान भावूक झाला आहे. सलमाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षयसाठी खास मेसेज देखील लिहिला आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने ‘सुपरस्टार सिंगर 2’ (Superstar Singer 2) या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अक्षय कुमारसमोर स्पर्धकांनी ‘फुलो का तारो का सबका केहना है…” हे गाणं सादर केलं. सोबत अक्षय कुमार आणि त्याच्या बहिणीचे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यात आले. यासोबतच अक्षय कुमारची बहिण अल्का भाटियाचा व्हिडीओ मेसेज दाखवण्यात आला. ज्यामुळे अक्षय कुमार फारच भावूक झाला.

अक्षयची बहिण अल्काने व्हिडीओद्वारे त्याचे विशेष आभार मानले. एक भाऊ म्हणून त्यानं मला कायमच साथ दिली. पण त्यासोबत प्रसंगी तो माझे वडील आणि मित्र दोन्हीही झाला, असं त्या म्हणाल्या. अक्षयचा हा व्हिडीओ सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसंच त्यांनं अक्षयसाठी खास मेसेजही लिहिला आहे.

अक्षय कुमारचा व्हिडीओ शेअर करत सलमान खाननं लिहिलं की, “आत्ता मी एक असा व्हिडीओ पाहिला जो मला सर्वांबरोबर शेअर करायचा आहे. अक्की देवाचे आशीर्वाद तुझ्यावर कायमच असतील. तू कमाल आहेस. हा व्हिडीओ पाहून मला खूप भारी वाटलं. कायम फिट राहा, नेहमीच काम करत राहा. देव कायम तुझ्याबरोबर असेल.” दरम्यान, अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Sumitra nalawade: