भारतात या दिवशी होणार ‘किसी का भाई किसी की जान’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सिनेप्रेमी या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, जानेवारीमध्ये या चित्रपटाचा पहिला टीझर दर्शकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासूनच, चाहत्यांमध्ये थिएट्रिकल चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ईदच्या मुहूर्तावर त्याचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया आणि यूरोपियन देशांमध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचे तिकीट ट्रेलर रिलीज होण्याआधीच विकले गेले आहेत.

या दिवशी भारतात होणार अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला 17 एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमान खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी जान’ या सिनेमात सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच या सिनेमात सलमानसोबत पूजा हेगडे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमान खान आणि पूजा हेगडेसह या सिनेमात भूमिका चावला, शहनाज गिल आणि पलक तिवारीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Dnyaneshwar: