सलमान खान सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांवर भडकला; म्हणाला, “जे लोक सिडनाज सिडनाज करतात त्यातल्या एकाला…”

मुंबई | Salman Khan – अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या चांगलीच चर्चेत आहे. शहनाज लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण शहनाजचं नाव घेतलं की सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) नाव घेतलंच जातं. सिद्धार्थचं 2021 साली हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. या धक्क्यातून शहनाज सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शहनाज-सिद्धार्थचे चाहते अजूनही सिडनाज सिडनाजचा जप करत आहेत. त्यामुळे अशा चाहत्यांवर सलमान खान (Salman Khan) भडकला आहे. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेला होता. यावेळी कपिल शर्मा शहनाजला विचारतो, ती इतकी क्यूट कशी काय आहेस. यावर शहनाज उत्तर देत असताना अचानक सलमान बोलू लागतो. तो म्हणतो, “शहनाजला सोशल मीडियावर नेहमी सिडनाज सिडनाज म्हटलं जातं. आता काय आयुष्यभर ती अविवाहितच राहिल का? हे लोक जितके सिडनाज सिडनाज करतात त्यातल्या एकाला जरी हिनं पसंत केलं तर तो लगेच हो म्हणेल.”

पुढे तो शहनाजला म्हणतो, “तू लोकांचं ऐकू नको, तुझ्या मनाला जे पटतंय ते कर आणि आयुष्यात पुढे जा”, सलमान शहनाजला हा सल्ला देतो. त्यानंतर शहनाज भावूक होताना दिसते. सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, शहनाज डान्सर, अभिनेता राघव जुयालला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. तसंच राघव आणि शहनाज लिव्हइनमध्येही राहत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अद्याप त्या दोघांनी कोणताही खुलासा केलेला नाहीये.

Sumitra nalawade: