जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खानने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

मुंबई | Salman Khan – बॅालिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसंच राज्याच्या गृह विभागानं देखील त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणामध्ये लॅारेन्स बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचा संशय गृहविभागाला आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. त्याचबरोबर सिद्धू मुसेवाला प्रमाणे मारुन टाकू अशी धमकी मिळाल्यानंतर सलमान खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इंडीया टुडेच्या वृत्तानुसार, “मला हे पत्र मिळालेलं नाही. माझ्या वडिलांना हे पत्र मॅार्निंग वॅाकवर असताना मिळाले. आजकाल माझे कोणाशीही वैर नाही. माझ्याकडे कोणावरही संशय घेण्याचे ठोस कारण नाही. तसेच माझा अलीकडे कोणाशीही नाद झालेली नाही. कोणताही धमकीचा कॅाल किंवा संदेश आलेला नाही.” असं सलमान खानने पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, ५ जून रोजी सलीम खान यांना त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक धमकीचं पत्र मिळालं होतं. या पत्रामध्ये सलमान खानचाही सिद्धू मुसेवाला करु अशा आशयाची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान या प्रकरणाचा तपास आणि इतर महत्त्वाची माहिती नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज दिली आहे.

Sumitra nalawade: