“कौरवांनी द्रौपदीस अपमानित केलं तेव्हा, श्रीकृष्ण अवतरले त्याप्रमाणे…”

मुंबई – महाराष्ट्रामध्ये मागील 10 दिवस जे काही सुरू होतं त्याचं उत्तर काल अवघ्या राज्याने पाहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवीन नेतृत्त्व महाराष्ट्राला मिळालं आहे. या दोन्ही नेत्यांना सर्वजण शुभेच्छा देत आहेत. तर सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

सत्ता सर्व प्रश्नांचे उत्तर. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडलं त्यावरुन सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळं झूठ यावरच शिक्कामोर्तब झालं. अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय?, असा सवाल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान,कौरवांनी द्रौपदीस भरसभेत अपमानित केलं. आणि धर्मराजासह सगळे निर्जीव बनून हा तमाशा पहात राहिले. तसेच काहीसं महाराष्ट्रात घडलं. पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रुचे रक्षण केलं. जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल आणि महाराष्टाची अब्रु लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील. नक्कीच! असंही अग्रलेखात म्हंटलं आहे.

RashtraSanchar: