मुंबई | Samantha Ruth Prabhu Birthday – आज (28 एप्रिल) दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) वाढदिवस आहे. त्यामुळे समांथावर चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समांथानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. समांथा करिअरप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते.
2017 साली समांथानं नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, चार वर्षांनंतर त्यांचा सुखी संसार मोडला आणि त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. पण संमाथा नागा चैतन्यसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी एका दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती. ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थसोबत समांथा रिलेशनशिपमध्ये होती.
तेलुगू चित्रपट ‘जबरदस्त’च्या सेटवर समांथा आणि सिद्धार्थची भेट झाली होती. त्यानंतर त्या दोघांच्यात जवळीक वाढू लागली. तसंच ते रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर समांथा सिद्धार्थसोबत लिव्ह इनमध्येही राहत होती. तसंच एका पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थने समंथासाठी खास डान्सही केला होता. समांथाला सिद्धार्थसोबत लग्नही करायचं होतं. पण काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.