समरसता साहित्य संमेलन नागपुरात

‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’ विषयावर अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख भाष्य करणार आहेत. पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे ‘अण्णाभाऊ साठे ः समतेचे पथिक’ या विषयावर भाष्य करतील. दुर्गेश सोनार यांच्या अध्यक्षतेत निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल.

महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित नागपूर येथे होणार्‍या १९ व्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन २ जुलै रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार तरुण विजय यांच्या हस्ते होणार आहे. सिव्हिल लाईन्सस्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत होणार्‍या या दोनदिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे आहेत.

सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ९: वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. गुरुदेव सोरदे स्मृती व्यासपीठावर उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी संमेलनाध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. प्रसन्न पाटील, निमंत्रक सुनील वारे, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Nilam: