“कोट्यावधी रुपये खर्च करून छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका” – संभाजी भिडे

जुन्नर | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात एका कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे वक्तव्य केले आहे. “शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला. त्यांचा जन्म हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच झाला पाहिजे,” संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केले आहे.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“आमची राज्य सरकारला विनंती आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यांचा जन्म हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच झाला पाहिजे. आज त्यांचे नको इतके पुतळे उभारले जात आहेत. अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. या स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली आहे.

Dnyaneshwar: