हिंगोली : (Sambhaji Brigades Opinion On Maharashtra Politics On Chhatrapati Sambhaji Maharaj) “छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते.” हिवाळी अधिवेशनाच्या (Winter ssession 2022, maharashtra) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या या वक्तव्याने राज्यात वातावरण तापलेलं दिसत आहे. भाजप (BJPMaharashtra) आणि शिंदे (Shinde Group) गटातील नेते अजित पवारांनी राजीनामा (Ajit Pawar Resignation) द्यावा अशी मागणीही करत आहेत. आज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. दरम्यान, संभाजी ब्रिगेड कडून मात्र अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध होताना दिसत नाही.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आकरे (Manoj Akare Sambhaji Brigade) यांनी छातार्पती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणे वावगं ठरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” भारतीय संस्कृतीचे संरक्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडं आपण बघतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. तो धार्मिक नव्हे तर स्वातंत्र्य लढा होता. सर्व जाती-जमातीचे लोक या स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आले. त्यातून स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्याची निष्ठा ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांनी लढाया केल्या. त्यामुळं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणणं काही वावगं नाही. स्वराज्यरक्षण हेचं छत्रपती संभाजी महाराज यांचं धर्मरक्षण होतं.
“मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची बदनामी होत होती. तेव्हा अनेकजण शांत बसून होते. मात्र, आता संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक असा वाद निर्माण करत आहेत. भाजप आणि आरएसएसचं बांडगुळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील हे जेव्हा महापुरुषांचे अपमान करत होते तेव्हा हे कुठं होते. हे महापुरुषांचा अपमान हे सगळं हेतुपरस्पर षड्यंत्र चालू आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते हे आम्ही सिद्ध करून दाखवू.” अशी प्रतिक्रिया मनोज आकरे यांनी दिली आहे.