महाराष्ट्रातील आमदारांना संभाजीराजेंचे खुलं पत्र; म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. संभाजीराजे ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच पाठिंबा दिला आहे. अशात संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र लिहिले आहे. पत्रातून निवडणुकीत विजयी होण्यासाठी अपना सर्वांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे संभाजीराजे यांनी पत्रातून म्हटले आहे.आवाहन सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केले आहे, असे संभाजीराजेंनी पत्रात आवाहन सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केले आहे, असे संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेसाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी द्यावी, म्हटले आहे.

Prakash Harale: