नांदेड : (Sambhajiraje Chhatrapati On formers) दरवर्षी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. आज राष्ट्रीय शेतकरी दिवस (National Farmers Day) आहे. या दिवसानिमित्त संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी थेट बांधावर जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी शेतकरी दिनाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या समस्या जाणून घेतला आहेत.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत हे प्रत्येकानी लक्षात घेतलं पाहिजे. कष्टाच्या मानाने मिळणाऱ्या मोबदल्याचा विचार केला असता आजही बळीराजा त्रासात असल्याचे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले. शेतकरी दिनाच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. स्वराज्य संघटनेच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी महत्वाचा घटक असल्याचे ते म्हणाले. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
संभाजीराजे यावेळी म्हणाले, बाकीची सगळी कामं बाजूला ठेऊन आपल्या शेतकऱ्याला कशी ताकद मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी शेतमालाला योग्य तो दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आधीच अतिवृष्टीमुळं आमच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी संभाजीराजेंना दिला. यावेळी संभाजीराजेंनी शेतकऱ्यांच्या समस्या एकूण घेतल्या. तसेच सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.